Sheli Palan Yojana 2025: महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे

Sheli Palan Yojana 2025 नमस्कार मित्रांनो कृषी विकास या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या बातमीमध्ये शेळी पालन योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे याविषयी सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत या योजनेसाठी सरकार आपल्याला किती टक्के अनुदान कागदपत्रे काय काय लागणार या सर्व गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत

शेळी पालन योजना 2024-25

शेळीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जाणारा एक व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये जर प्रशिक्षण घेऊन आपण हा व्यवसाय केला तर या व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला उत्पन्न मिळू शकते हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार सुद्धा शेतकऱ्यांना प्रेरित करत आहे या व्यवसायासाठी सरकार शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान देखील देत आहे तर मित्रांनो हे अनुदान सर्व शेतकऱ्यांसाठी नाही आहे या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत

शेळी पालन योजना साठी पात्रता

तर मित्रांनो आतापर्यंत आपण या योजनेसाठी अनुदान किती मिळते याबद्दल माहिती पाहिली आहे तरी या योजनेमध्ये आता पात्रता काय असणार आहे याची देखील माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम जो लाभार्थी आहे त्याच्याकडे शंभर बकऱ्यांसाठी 9000 चो.मी जमीन असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही या अर्ज करण्यासाठी पात्र आहात

शेळी पालन योजना साठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र /दाखला
  • रहिवाशी दाखला(सरपंच,ग्रामसेवक,तलाठी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जागेचा उतारा
  • बँक पासबुक
  • ७/१२ उतारा

शेळीपालन योजनेसाठी अर्ज कसा करायचा

तर मित्रांनो सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तुम्हाला तेथे सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला शेळीपालन साठी जी शंभर रुपये फीस असेल ती सुद्धा भरून टाकायची आहे त्यानंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची पावती सुद्धा सेव करून घ्यायची आहे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या ही सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता

Leave a Comment